मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनसेनं ठाकरे गटाकडे बोट दाखवले आहे. पण, अशा चिल्लर लोकांकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही,सुरक्षा मिळवण्यासाठी हा स्टंट केला असावा, आमचे स्वारस्य पक्ष वाढविण्यात आहे, असं म्हणत ठाकरे गटाच्या युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी देशपांडेंना टोला लगावला.