राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशी सभागृहात भाषण करताना अजित दादांचा मिश्कील अंदाज पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांना 'अंकल' म्हणून डिवचलं. तर यावेळी अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपवर जोरदार टोलेबाजी केली.