विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील पोट निवडणुकांनी राजकीय वातावरण तापलंय. पुण्यातील घडामोडींना प्रचंड वेग आलाय. कसबा पेठ आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. तर याच निवडणुकीत मनसेदेखील मैदानात उतरणार आहे. राज ठाकरे उद्यापासून दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येत आहेत.