जात प्रमाणपत्र प्रकरणी विशेष न्यायालयाने अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांच्या वडिलांना मोठा धक्का दिला आहे. राणा यांनी दोषमुक्ततेसाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने डिसेंबर महिन्यात फेटाळला होता. तसेच शिवडी महानगरदंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवरही स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. तर आता, मुंबईतील शिवडी न्यायालयाकडून नवनीत राणा यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांना फरार म्हणून घोषित करण्यात आलं आहे.