विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. असे असतानाच बुलढाण्यात शिंदे गटाने पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या गडाला सुरुंग लावला आहे. मोताळा नगरपंचायतीमधील काँग्रेसच्या १२ पैकी आठ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला आहे.