अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणुक 30 जानेवारी रोजी होत आहे. मात्र दोन दिवस आधी अपक्ष उमेदवार शरद झामरे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भात उमेदवार धीरज लिंगाडे म्हणाले की, ती ऑडिओ माझी नसून ते विरोधी पक्षाचे षडयंत्र आहे.