महाराष्ट्रात आल्यापासूनच महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्ये करण्याची मालिकाच लावलेल्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे राज्यामध्ये राज्यपाल बदलाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया देताना खोचक टीका केली. शरद पवार आज कोल्हापूरमध्ये बोलत होते. यावेळी कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रावरून पवारांनी मोजक्या शब्दात टीका केली आहे.