Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/28/2023
गुजरात दंगलीला आता 20 वर्षे उलटून गेलीत. पण त्याच घटनेवर आधारित नुकतीच प्रदर्शित झालेली बीबीसीची एक डॉक्युमेंटरी मात्र सध्या वादात आहे. या माहितीवरून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU), जामिया विद्यापीठात राडा झाला. या पार्श्वभूमीवर आता 'बीबीसी'चा मोदींवरील माहितीपट दाखवण्यास मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने (टीस) ने नकार दिला आहे. संस्थेच्या परिसरात माहितीपट दाखवल्यास कारवाई करण्याचा 'टीस'ने इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने नकार दिला आहे. टीस'ने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, इन्स्टिट्यूटमधील काही विद्यार्थी मोंदीवरील माहितीपट संस्थेच्या प्रांगणात दाखवण्याची तयारी करत आहे. या माहितीपटावरून देशातील काही संस्थेत अशांतता निर्माण झाली आहे. तसेच या माहितीपटाला विरोध करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी संस्थामध्ये बैठका देखील घेतल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांना सूचना करण्यात येत आहे की, अशा कोणत्याही कृतीत सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

#BBCDocumentary #JNU #Jamia #TISS #Mumbai #BBC #Documentary #PMModi #Hindus #Godhra #Gujarat #HWNews

Category

🗞
News

Recommended