2 months ago

‘गद्दारांना क्षमा नाही, येत्या निवडणुकीत ठाणेकर...’, Rajan Vichare यांचा हल्लाबोल | Eknath Shinde

HW News Marathi
HW News Marathi
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज (शुक्रवार, 27 जानेवारी) जयंती असून यानिमित्ताने शिंदे गटाने खारकर आळी येथील दिघे यांच्या स्मृतीस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी शक्ती स्थळावर दिघे यांचे दर्शन घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे आले होते. यावेळी विचारेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की "दिघे साहेब गेलेले नाहीत, ते आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. त्यामुळे 'आनंदाश्रम'चे नाव कोणीही बदलू शकत नाही. तसेच आगामी निवडणुकीत गद्दारांना जनता उत्तर देईल अशी टीका देखील राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली.

#RajanVichare #EknathShinde #AnandDighe #Thane #TMC #Elections #ThaneMunicipalCorporation #UddhavThackeray #Shivsena #BalasahebThackeray #Maharashtra #HWNews

Browse more videos

Browse more videos