छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी विरोधकांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन दूर करावं, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राज्यभरात विरोधकांनी रान उठवलं होतं. त्यातच आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपला राजीनामा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.