मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट १० ने पवईतील आंबेडकर गार्डन जवळून एका ३१ वर्षीय इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 500 रुपयांच्या १६ हजार बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ८० लाख रुपये किमतीचे तब्बल १६० बंडल यावेळेस जप्त करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा जप्त केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.