बहुचर्चित वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं होतं. या प्रकल्पावरुन अजूनही महाविकास आघाडी आणि शिंदे फडणवीस सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अशातच आता यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे ती म्हणजे या प्रकल्पाला फायनान्सर मिळत नसल्याचं सांगितलं जातंय. पण या इतक्या मोठ्या प्रकल्पाला गुंतवणूकदार न मिळण्यामागे काय कारण असेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.