बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील कोराडी धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला भगदाड पडले असून त्याचे दगड निखळून पडल्याने ही भिंत कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे. यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.