ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी अवघ्या एका वाक्यात भाजप नेते नितेश राणे यांचा पाणउतार केला आहे. आमदार नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात कणकवलीतील नांदगावच्या ग्रामस्थांना धमकी दिली होती. यावरुन बराच वाद रंगला. यावर आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. पण आदित्य ठाकरे यांनी नितेश राणे यांचं नाव ऐकताच 'शी त्यांच्यावर काय बोलायचं' असं म्हणत अवघ्या एका वाक्यात विषय संपवला.