मुंबईतील वांद्रे येथील खेरवाडी पोलीस ठाण्यात जप्त साहित्य ठेवलेल्या स्टोअर रूममध्ये सोमवारी दुपारी सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. ती आग विझवताना एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा स्फोट कसा झाला याची पुष्टी पोलिसांनी अद्याप केलेली नाही.