उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये जावून भेट घेतली. दोन युवा नेते एकत्र आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीवर आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केलं. आदित्य ठाकरे म्हणाले की, तेजस्वी यादव यांच्यासोबत आधीपासून चर्चा सुरू होती. कोरोनाच्या काळात भेट होऊ शकली नाही.