राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारीहून सुरु झाली आहे. ही भारत जोडो पदयात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. दरम्यान, ही पदयात्रा वेगाने व जनतेच्या मोठ्या प्रतिसादाने पुढे जात आहे. जनतेचा, लोकांचा सहभाग वाढत असून आता ही लोकचळवळ झाली आहे, अशा कॉंग्रेस नेत्यांच्या भावना आहेत. दरम्यान, काही दिव्यांग व्यक्ती देखील या पदयात्रेत सहभागी होत असून या पदयात्रेदरम्यान राहुल गांधींनी त्यांच्याशी संवादही साधला आहे.