दिवाळीनिमित्त आज पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलास भाष्य केले. मी सागर बंगल्यावरच खुश आहे. इथे खूप सकारात्मकता आहे असं सांगत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे टीकाकारांना उत्तर दिले आहे. राज्याच्या राजकारणात भाजपानं सत्तांतर घडवलं परंतु उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना शपथ घ्यायला लागल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.