गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा सातत्याने शिंदे, फडणवीस सरकारवर हल्लाबोल सुरूच आहे. आता अंधारे यांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुषमा अंधारे या कोण आहेत, त्यांनी आपला इतिहास तपासावा असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.