महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु आहे. मात्र सुनावणी सुरू असतानाच शिवसेना (ShivSena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एक मोठं विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात विजय आपलाच होणार, आई भवानी आणि न्याय देवतेवर माझा विश्वास आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी विजयाची खात्री केली आहे.