आजपासून मुंबईतील सुप्रसिध्द माऊंट मेरी जत्रेला सुरुवात झाली आहे. पुढील आठ दिवस म्हणजे 11 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या जत्रेला 'वांद्रे महोत्सव' असंही म्हटलं जातं. 100 वर्षापूर्वी पासून या जत्रेची परंपरा आहे. ख्रिश्चन समाजात या जत्रेला विशेष महत्व आहे. मुंबईसह लांबून लोक या जत्रेत सहभागी होवून आनंद लूटतात आणि माऊंट मेरीचं दर्शन घेतात.