भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपचा लक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीवर (Baramati) आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे हे या बारामतीच्या खासदार आहे. भाजपच्या नेते आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन येत्या काही दिवसात बारामतीचा दौरा करणार आहे. भाजपने २०१९ मध्ये A फॉर अमेठी जसे प्लॅन राबविला होता तसेच प्लॅन यंदा भाजप कढून B फॉर बारामतीचा नियोजन करण्यात येत असल्याचा भाजपच्या अनेक नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.