मुंबई स्फोटांचा दोषी याकूब मेमनच्या कबरीवरून भाजप आणि शिवसेनेदरम्यान चांगलाच वाद चिघळलाय. काल याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीचे फोटो ट्वीट करून भाजप नेत्यांनी हे कुणाच्या आशीर्वादानं होतंय, असा सवाल उद्धव ठाकरे यांना केला होता. मात्र याकूब मेमनची कबर कोणत्या सरकारच्या काळात बांधण्यात आली, हे तुम्हीच सांगा, असा प्रत्यारोप शिवसेनेनं केला. याकूब मेमन याच्या कबरीचा प्रकरण सध्या पेट घेताना दिसत आहे.