पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या युद्धनौकेची रचना स्वदेशी आहे. पण सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भारतीय बनावटीच्या INS विक्रांतमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तूच स्वदेशी नाहीत. म्हणजेच यात वापरण्यात आलेले काही भाग हे परदेशातूनही आयात करण्यात आलेले आहेत.