काही दिवसांपूर्वी जालन्यातील जांब समर्थ येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या पूर्वजांच्या आठ पंचधातूंच्या मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली. त्यानंतर गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनही केलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः याप्रकरणी लक्ष घातलं असून लवकरच चोरटे जेरबंद होतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तर आता भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी थेट पोलिसांनाच इशारा दिला आहे.