मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची चर्चा होती. या भेटीत फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर रात्री भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यानंतर मंगळवारी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यामुळे राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र अचानक वाढलंय ज्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.