मुंबईतील बोरीवली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने आतापर्यंत ५६ हून अधिक दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या मुख्य चोराला अटक केली आहे. यापूर्वी 35 वेळा हा चोर तुरुंगात गेला असून या बदमाश चोराने स्टॅटिक्स सायन्समधून एमएससी केले आहे. मात्र, मुंबई आणि गुजरातमध्ये त्याने आतापर्यंत शेकडो दुकानांमध्ये चोऱ्या केल्या आहेत.