नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नारळी पौर्णिमेनिम्मित बाबासाहेब गावडे मंडई, वरळी बीडीडी चाळीत उत्सव करण्यात आला.