मंगळवारी एकूण 18 आमदारांचा शपथविधी पार पडला. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे. पण या मंत्रिमंडळात कोणाला कोणतं खातं मिळणार याची जोरदार चर्चा रंगली आहे.