भाजपनं मिशन २०२४ हाती घेतलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या १४१ जागांवर भाजपनं आता लक्ष केंद्रित केलं आहे. या जागा जिंकण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. ह्याच पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी बारामतीमध्ये घडत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप श्रेष्ठींकडून बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्याही कामाला लागल्या आहेत. त्यांनी या मतदारसंघाचा दौरा जाहीर केला असून त्या येत्या १६ ते १८ ऑगस्टदरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात गाठीभेटी घेणार आहेत.