आम आदमी पार्टीच्या (AAP) मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन (Preeti Sharma Menon) यांनी शनिवारी एचडब्ल्यू मराठीशी खास संवाद साधला. यावेळी प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले की, आगामी बीएमसी निवडणुकीत पक्ष सत्तेवर आला तर ते मुंबईकरांना मोफत वीज पुरवतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आपच्या तीन प्रमुख अजेंडांबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या की “आमचे सहा प्रमुख अजेंडा आहेत. पहिले दोन अजेंडा म्हणजे पाणी आणि वीज, दिल्ली आणि पंजाबमध्ये 1000 वापरकर्त्यांना मोफत पाणी आणि वीज मिळत आहे, तर मुंबईला का नाही?”, असा सवाल त्यांनी केला. 'आप' सत्तेत आल्यास आम्ही वीज फुकट देऊ, पाणी मोफत देऊ, प्रत्येक घराला पाण्याचे कनेक्शन देऊ, पाण्यावर प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, असं त्यांनी सांगितलं.