पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज पुढील सुनावणीसाठी कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना कोठडी वाढणार की जामीन मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असताना कोर्टाने त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांचा पुढील ४ दिवसांचा मुक्कामही ईडीच्या कोठडीत असणार आहे.