आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश दिले. यात पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः सांगली आणि कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्याबाबत चर्चा झाली.