एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. खरंतर शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतु, आज प्रथमच मुख्यमंत्री मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले.