घोडबंदर रोडवरील काजूपाडा या ठिकाणी खड्ड्याचा पहिला बळी गेल्यानंतर या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी यंत्रणा आणि पालिका अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. संभाव्य आपत्ती संदर्भात सतर्क राहण्याचा सूचना देण्याबरोबरच त्वरित खड्डे भरण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.