एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी मला दगा दिला, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. याच विधानावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.