• 2 years ago
गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली नाही, त्याचबरोबर स्वाधार योजनेची रक्कम देखील देण्यात आली नाही. विद्यार्थ्यांना एक ना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बीडमध्ये रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून, विद्यार्थी हे रस्त्यावर उतरले आहेत. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सरकार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

#Beed #DhananjayMunde #RepublicanParty #StudentProtest #Scholarship #Collector #YashomatiThakur #UdaySamant #VarshaGaikwad #UddhavThackeray #HWNews

Category

🗞
News

Recommended