बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू सुरुवातीपासूनच कोल्हापूर जिल्हा राहिला आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेकडून शिवबंधन नाकारल्यानंतर संजय पवारांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली, तर भाजपनेही राजकीय खेळी करताना धनंजय महाडिक यांना उमेदवारी देत निवडणुकीतील चुरस वाढवली.