साताऱ्यात छ.उदयनराजे भोसले एका कार्यक्रमाला उपस्थित झाले होते,त्यावेळी पत्रकारांनी खासदार छत्रपती उदयनराजे यांना संजय राऊतांच्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी खासदार छ.उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात शिवसेना नेते संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला.उदयनराजे भोसले यांनी संजय राऊतांना त्यांच्या स्टाईलमध्ये इशारा दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, संजय राऊत कोण मला माहित नाही.