या भेटीतून अपेक्षा होती की महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे मराठा आरक्षण व ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत गंभीरपणे चर्चा करतील. पण गंभीरपणे चर्चा करण्याऐवजी १२ विषय घेऊन आरक्षणाच्या महत्वाच्या विषयाचे १२ वाजवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या दृष्टीने मराठा आरक्षण व १२ आमदारांची नियुक्ती याच्यामध्ये काही फरक आहे की नाही? त्या १२ आमदारांची नियुक्ती पुढे २ हजार वर्ष जरी झाली नाही, तरी काही बिघडणार नाही, असे राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आज उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीबाबत बोलताना म्हणाले.