EXCLUSIVE: मंत्री संजय राठोडांना पोहरादेवी पावणार का ? | Poharadevi Temple | Sanjay Rathod |

  • 3 years ago
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून संजय राठोड यांच्यावर टोकाची टीका होत आहे. भाजपने हा मुद्दा लावून धरलेला आहे. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोड यांचे नाव आल्यानंतर ते अज्ञातवासात होते. त्यांचा नेमका पत्ता कोणालाही माहिती नव्हता. त्यामुळे या प्रकरणावर राठोड यांचे कोणतेही स्पष्टीकरण न आल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या पार्श्वभूमीवर तब्बल 15 दिवसांनंतर राठोड पहिल्यांदाच सर्वांसमोर येत आहेत. ते मंगळवारी पोहरा गडावर जाऊन पोहरादेवीचे दर्शन घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. याठिकाणी बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल झाली आहे.
#PoojaChavan #SanjayRathod #Poharadevi #Sarkarnama

Recommended