चारशे वर्षांची परंपरा खंडीत...

  • 3 years ago
बुलढाणा : कोरोनामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. रोजगार, नोकरी, व्यवसायाला कोरोनामुळे फटका बसला आहे. सांस्कृतिक जीवनावर त्यांचा परिणाम झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील "नंदजी का उत्सव"यंदा रद्द करण्यात आल्याने 400 वर्षांची परंपरा यामुळे खंडीत झाली आहे.
बुलढाणा जिल्हयातील आदिवासी भागातील वड़गाव वान नावाच गाव. येथे 400 वर्षापासून गोकुळ अष्टमीनिमित्त "नंदजी का उत्सव" साजरा करण्यात येतो. पण यंदा कोरोनामुळे हा उत्सव रद्द करण्यात आला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने सात दिवस अनेकांना रोजगार मिळत होतो. लोककलावंत यात सामील होत होते. पण यंदा कोरोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नेहमीचं गोकुळ अष्टमीला भजन, कीर्तन, दशावतारी सोंग आदी कार्यक्रमामुळे उत्साहाचा खळखळून वाहणारा हा झरा आज शांत होता.#Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews

Recommended