कर्जमाफीसाठी बीडमध्ये शिवसेना महिला आघाडीचे मुंडण

  • 3 years ago
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु असतांनाच
त्यात आता महिलांनी देखील उडी घेतली आहे. बीड येथे जिल्हाधिकारी
कार्यालया समोर शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करत
सरकारचा धिक्कार व निषेध केला. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा,
संपात सहभागी व्हा असेआदेश पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना
दिले होते. महाराष्ट्र बंदमध्ये देखील शिवसेनेचा मोठा सहभाग होता. या
पार्श्‍वभूमीवर बीड शिवसेना महिला आघाडीने मुंडण करत शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीची जोरदार मागणी सरकारकडे लावून धरली.

Recommended