वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची शाळा भरली! | Marathi News I Live Marathi News | मराठी बातम्या |
  • 3 years ago
उमरेड (जि. नागपूर) : सोमवारी दुपारी बारा वाजता स्थानिक वन विभागाच्या कार्यालय परिसरात उपविभागीय वन अधिकारी नरेंद्र चांदेवार तथा वैष्णवी जरे, वन परिक्षेत्र अधिकारी, दक्षिण उमरेड यांच्या उपस्थितीत दक्षिण विभागाच्या वन कर्मचाऱ्यांची शाळा भरली. उमरेडच्या दक्षिण वनपरिक्षेत्रअंतर्गत एकूण १८ हजार हेक्टर वन भूभाग आहे. त्यात राखीव वने, संरक्षित वने आणि झुडपी जंगल अशी वर्गवारी होते. त्यापैकी ६० हेक्टर वन भूभागावर अतिक्रमण करण्यात आले असून, त्या अतिक्रमणाचे निर्मूलन कशा पद्धतीने करायचे ? याबाबत शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली होती. त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया सहायक वन संरक्षक नरेंद्र चांदेवार यांचे शब्दात.
(व्हिडिओ - सतीश तुळसकर)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended