गुमगावच्या आठवडी बाजाराचे 'अर्थकारण' अजूनही विस्कटलेलेच! | Latest Marathi News I मराठी बातम्या |
  • 3 years ago
गुमगाव (जि. नागपूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात महिन्यांपासून हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील आठवडी बाजार बंद होता. शासनाच्या परवानगीने आठवडी बाजार सुरू झाला असला तरी सध्या कित्येक व्यावसायिकांना ग्राहकांची वाट बघावी लागत आहे. एकंदरीतच आठवडी बाजारातील आर्थिक उलाढाल ठप्पच झाली असून, बाजारातील मध्यम व्यावसायिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न सध्यातरी कायम आहे. येथील आठवडी बाजाराची खरी भिस्त असलेला कामगार आणि मजुरवर्ग अजूनही पूर्णपणे परत आला नाही. परिणामी मोठ्या प्रतिक्षेनंतरही ग्राहकच फिरकत नसल्याचे व्यावसायिक सांगतात. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बहुतांश लोकांचा रोजगार बुडाला. हाताला कामे नाहीत. मजुरी मिळाली नाही. म्हणून आठवडी बाजारातील 'अर्थकारण' सध्यातरी 'लॉकडाऊन' मध्येच असल्याचे चित्र आहे.
(व्हिडिओ : रविंद्र कुंभारे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended