संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको I Live Marathi News | ठळक बातम्या | मराठी बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको
राजुरा (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा वन विभागाआंतर्गत राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षी वाघाच्या बंदोबस्तासाठी संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी राजुरा येथे रस्तारोको आंदोलन केले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त शेतकऱ्यांनी वनविभागाच्या विरोधात नारेबाजी केली. नरभक्षक वाघाला ठार मारा व वाघाला जेरबंद करण्यात अपयशी ठरलेल्या वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तात्काळ निलंबित करा यांच्यासह अनेक मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले. (व्हिडिओ : आनंद चलाख-मनोज आत्राम)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended