इंग्रजकालीन पडक्या इमारतीत लसीकरण केंद्र | Marathi News I Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या |
  • 3 years ago
चिमूर (जि. चंद्रपूर) : चिमूर या ऐतिहासिक क्रांतीकारी शहराने देशात पहिल्यांदा इंग्रजांना सडो की पडो करून सोडले. देशाला स्वांतत्र मिळून सुद्धा प्रशासनाचे इंग्रज प्रेम काही कमी झालेले नाही. इंग्रजकालीन पडक्या इमारतीमध्ये खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लसीकरण उपकेंद्र चालविले जात आहे. या केंद्रातून स्तनदामाता, गरोदरमाता व बालकांना आठवडयातून दोनदा मंगळवार व शुक्रवारी लसीकरण केले जाते. ही इमारत मोडकडीस आली असून, छताला पावसाळ्यात गळती लागते. इमारतीमध्ये मिटर आहे. मात्र, वीज कनेक्शनच नाही. प्रशासनाच्या या इंग्रजीवास्तू प्रेमापासून स्वांतत्र्य कधी मिळणार असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
(व्हिडिओ - जितेंद्र सहारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended