लॉकडाऊनचा गणेश मूर्तीकारांनाही फटका | Latest Marathi News I Marathi News | ठळक बातम्या | Sakal Media
  • 3 years ago
मूल : कोरोनाच्या परिस्थितीतील लॉकडाऊनचा फटका मूल येथील गणपती मूर्तीकारांना बसला. 22 ऑगस्टपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. परंतु हा उत्सव साजरा करताना शासनाने काही नियम घालून दिले आहेत. त्या नियमांच्या निर्देशाचे पालन करीत मूर्तीकार गणपती मूर्ती साकारीत आहेत. मूल येथील प्रसिद्ध मूर्तीकार चेपाजी पेंटर यांची चौथी पिढी या व्यवसायात आहेत. त्यांचे कुटुंब चेपाजी पेंटर या नावानेच ओळखले जातात. घरगुती मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता त्यांच्याकडे आतापर्यत सार्वजनिक गणेश मंडळाचे दोनच मूर्तींचे आर्डर मिळाले आहेत. मूर्तीकारांचे जीवन या व्यवसायावर अवलंबून असते.
(व्हिडीओ : विनायक रेकलवार)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended