परिश्रमातून विजयाने मिळविले घवघवीत यश | Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
गुमगाव: मनात जिद्द असली की विपरीत परिस्थितीतही अडथळ्यांवर नक्कीच मात करता येते, याची प्रचिती विजया या विद्यार्थिनीने दिली आहे. हिंगणा तालुक्यातील वागदरा येथील विजया भगतसिंग देवगडे हिने दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण प्राप्त करीत घवघवीत यश मिळविले आहे. विजयाचे वडील भगतसिंग देवगडे परिसरातील गावोगावी भरणाऱ्या आठवडी बाजारात जाऊन चपला-जोडे विकण्याचा छोटेखानी व्यवसाय करतात तर आई लता या गृहिणी आहे. घरची परिस्थिती बेताची असतानाही विजयाने मिळविलेल्या यशाबद्दल अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विजयाने मिळविलेले यश बघून आई-वडिलांना आनंदाश्रू आवरता आले नाही.
(व्हिडिओ : रवींद्र कुंभारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended