घरात राहूनच व्यायाम करा: अभिनेत्री अनन्या गिरी

  • 3 years ago
नाशिककरांची आवडती अभिनेत्री अनन्या गिरी ही मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली आहे. पैसा पैसा, मिसमॅच, टाईमपास 2 यासारखे अनेक चित्रपट, साम टीव्हीवरील पारिजात तसेच असं सासर सुरेख बाई, एफआयआर, सिआयडी यासारख्या मालिकांमधून अभिनय केला आहे. सध्या चित्रीकरण बंद असल्याने ती घरात राहूनच व्यायामाला प्राधान्य देत आहे. रसिकांनाही तिने घरात राहूनच व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे.